देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय झालं? CM फडणवीसांनी दिली माहिती

CM Devendra Fadnavis इराण अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

ESakal

Updated on

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय. भारतातली परिस्थिती चिंताजनक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सांगितल्यानंतर लॉकडाऊन होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांसोबत बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा उपस्थित होते. या बैठकीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. लॉकडाऊन होणार किंवा इंधन पुरवठा खंडित होणार अशा अफवा पसरत आहेत, खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com