''सुनील केदारांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा''

''सुनील केदारांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा''

मंत्र्याच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

काँग्रेस पक्षातील वाद पुन्हा एकद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने काँग्रेस मंत्र्याला बरखास्त करावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. काँग्रसचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रसचे नेते आणि माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी केली आहे. आशिष देशमुख यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी जिल्हा बँकेत भ्रष्ट्राचार झाला असा असून कारवाई केदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

2002 मध्ये नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना मंत्री सुनील केदार यांनी 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवून बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा बँकेच्या भ्रष्ट्रचाराप्रकरणी सुनील केदार यांच्यासह इतर दहा जणांविरोधात महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने कोर्टात खटला दाखल केला आहे... हा खटला गेली 19 वर्षे कोर्टात सुरु आहे... आता याप्रकरणी सरकारी वकील म्हणून आसिफ कुरेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आसिफ कुरेशी हे काँग्रेसच्या लीगल सेलचे अध्यक्ष आहेत.. त्यामुळे ते या खटल्यात योग्य बाजू मांडू शकत नसल्याचा आरोपही देशमुख यांनी आपल्या पत्रात केला आहे.

''सुनील केदारांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा''
मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न; पुण्याच्या शेतकऱ्याचं निधन

या प्रकरणी आसिफ कुरेशी यांची नेमणूक रद्द करावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासोबतच सुनील केदार हे काँग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. ॲड. आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी ॲड. उज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी अशिष देशमुख यांनी केली आहे.

''सुनील केदारांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा''
एकनाथ शिंदे भाजपात जाणार? राणेंच्या वक्तव्यावर मंत्र्याचे उत्तर
''सुनील केदारांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा''
अमोल कोल्हे यांचं रुग्णालयातून खास आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com