उशिराने परीक्षा केंद्रावर हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ‘नो एंट्री’

विद्यार्थ्यांनो, उशिराने परीक्षा केंद्रावर पोचलात तर ‘प्रवेश’ नाकरण्यात येईल
Exam
ExamSakal

पुणे : विद्यार्थ्यांनो, तुम्ही दहावी-बारावीची परीक्षा देत आहात का!, मग हे तुमच्यासाठीच आहे. तुम्ही, दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी दिलेल्या वेळेपेक्षा उशिराने परीक्षा केंद्रावर पोचलात तर, आता मात्र परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. होय, परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हे पाऊल उचलले आहे. गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षेस उशिराने प्रविष्ठ होऊन देण्याची सवलत बुधवारपासून (ता.१६) बंद करण्यात येत आहे. त्यामुळे आता परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी दिलेल्या वेळेपेक्षा उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत याआधी काही सवलत दिली जात होती. यामध्ये उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र अपवादात्मक परिस्थितीत वेळेनंतर १० मिनिटे उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांना विलंबाच्या कारणाची खातरजमा करून केंद्र संचालक स्तरावर परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येत होती. या दहा मिनिटांनंतर अतिशय अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा देण्यास केंद्रावर आल्यास आणि त्यामागचे कारण केंद्र संचालकांना रास्त वाटल्यास विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव यांची दूरध्वनीवरून पूर्वमान्यता घेऊन आणखी १० मिनिटे म्हणजेच एकूण वीस मिनिटांचा विलंब क्षमापित करून परीक्षार्थ्याला परीक्षा देता येईल, अशी सूचनाही यापूर्वी राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.

Exam
Pune Corporation: स्थायीच्या उपसूचना बारगळणार ?

परंतु या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारीत झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने अशा प्रकरणांमध्ये संबंधिताविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षेस उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याची सवलत १६ मार्चपासून बंद करण्यात येत आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे जाहीर केले आहे.

सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी जास्तीत जास्त दक्षता पथके कार्यन्वित करून परीक्षा केंद्र, उप केंद्रांना वारंवार भेटी देऊन परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी शासनस्तरावरून आदेश दिले आहेत. परीक्षा केंद्रात मोबाईल व अन्य साधने बाळगण्यास आणि वापरण्यास प्रतिबंध केले असल्याचेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

Exam
पुणे : कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवुन 17 लाख रुपये लुटले

राज्य मंडळाने दिलेल्या सूचना :

- सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक

- विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर (प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यंत) परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक असेल

- अपरिहार्य कारणांमुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होतेवेळी विद्यार्थी आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून त्यांची तपासणी करून विभागीय मंडळाच्या मान्यतेने त्याला परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येईल

- परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.

‘‘दहावी-बारावीच्या परीक्षेदरम्यान होणाऱ्या पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा बसावा, यासाठी राज्य मंडळाने हे पाऊल उचलले आहे. बारावीच्या परीक्षेत रसायनशास्त्र आणि गणित विषयाच्या पेपर फुटल्याचे बोलले गेले. अर्थात, असा काही प्रकार झाला नाही. परंतु तरीही असे गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.’’

- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com