Raju Shetti l राजू शेंट्टीच्या मागणीवर तज्ञ समिती नियुक्त

राज्यभर चक्काजाम करून शासनाचे डोळे उघडणार हा निर्धार स्वाभिमानी संघटनेने केला.
raju shetty
raju shettyesakal

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी यासाठी गेल्या १५ दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालया समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिलेल्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी तज्ञ समिती नियुक्ती केली आहे. या तज्ञ समितीचे अध्यक्ष व ८ लोकांची समिती गठीत करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

raju shetty
सदाभाऊंच्या निशाण्यावर गृहमंत्री; म्हणाले,बड्या नेत्यांच खात...

गेल्या १५ दिवसापासून सुरु असलेल्या या आंदोलनानंतर अखेर संघटनेच्यावतीने दिलेल्या प्रस्तावावर अभ्यास होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज मिळावी यासाठी केलेल्या आंदोलनात रस्ता रोको करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या आंदोलना दरम्यान एका शेतकऱ्याने व्हिडिओ करून आपला जीव दिला. राज्यभर चक्काजाम करून शासनाचे डोळे उघडणार हा निर्धार स्वाभिमानी संघटनेने केला होता. आंदोलनाची तीव्रता पाहता उर्जामंत्र्यांनी राजू शेट्टीं सोबत मुंबईला बैठक घेतली. या बैठकित लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. यानुसार तातडीने हालचाली करून ८ सदस्यांची समिती नेमली आहे. ही समिती अभ्यास करून दिवसा १० तास विजपुरवठा करण्याबाबतचा अहवाल शासनास देईल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान आज साखर घोटाळ्यापेक्षा वीज वितरण कंपनीचा घोटाळा मोठा आहे. कोणत्या नेत्याचे कोणते कोणते प्रकल्प आहेत? हे लवकरच बाहेर काढणार असून वीज वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com