
स्वाभिमानीतून काढल्यानंतर आमदार भुयार हातात 'घड्याळ' बांधण्याची शक्यता
मुंबई: स्वाभिमानी शेतकरी हकालपट्टी झालेले आमदार देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल असा संकेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन २३ वर्षे झाली तरी विदर्भात म्हणावा तसा पक्ष वाढलेला नाहीये. विदर्भात पक्ष वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनही या प्रवेशाकडे पाहिलं जात आहे.
हेही वाचा: Petrol-Diesel Price: जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किंमती
त्यामुळे येत्या दहा एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र भुयार पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. शरद पवार देवेंद्र भुयार यांना विदर्भात मोठी जबाबदारी सोपवणार असल्याच्या चर्चा आहेत. देवेंद्र भुयार हे स्वाभिमानीचे आमदार होते. ते ज्या वरुड-मोरशी मतदारसंघातून आमदार आहेत, ती जागा राष्ट्रवादीसाठी राखीव होती. ते आजही विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सह्योगी म्हणूनच आहेत. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतृत्व नक्कीच त्यांच्या पक्षप्रवेशाचा विचार करतील, अशी माहिती प्रदेश सचिव संजय खोडके यांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा: ९७ कंपन्या IPO तून २.२५ कोटी गोळा करणार; गुंतवणुकीसाठी मोठी संधी
देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी़
देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार होते. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही घोषणा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 25 मार्च रोजी केली होती. अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील हिवरखेड गावात पार पडलेल्या स्वाभिमानीच्या शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली होती. आमदार देवेंद्र भुयारांसारख्या चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहिलो, याबद्दल मला माफ करा आणि मी तुमची जाहीर माफी मागतो अशा शब्दांमध्ये राजू शेट्टी यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या होत्या.
Web Title: Expulsion From Swabhimani Shetkari Sanghatana Possibility Of Mla Devendra Bhuyar In Ncp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..