Crop Insurance: शेतकऱ्यांना सरकारचा गंभीर इशारा! बोगस पीकविमा भरल्यास गुन्हा अन्‌ ५ वर्षे ब्लॅकलिस्ट! काय आहेत नवे नियम ?

New PMFBY Rules for Kharif 2025 Explained: राज्य सरकारकडून राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवण्यात येणार आहे. त्यानुसार आता फक्त उत्पादनावर आधारित पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सरकारकडून भरला जाणारा एक रुपया विमा हप्ता बंद झाला असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तर नगदी पिकांसाठी पाच टक्के हिस्सा भरावा लागणार आहे.
solapur sakal news
Mantralay maharashtrasakal media
Updated on

सोलापूर : राज्य सरकारकडून राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना राबवण्यात येणार आहे. त्यानुसार आता फक्त उत्पादनावर आधारित पीकविम्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सरकारकडून भरला जाणारा एक रुपया विमा हप्ता बंद झाला असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तर नगदी पिकांसाठी पाच टक्के हिस्सा भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी सोयाबीनसाठी एक हजार, तुरीसाठी ७४४, उडीद पिकासाठी ५५० तर कांद्यासाठी ६८० रुपये भरावे लागणार आहेत. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे.

राज्य सरकारने केंद्र सरकारच्या ८० : ११० प्रमाणानुसार कप आणि कॅप मॉडेल स्वीकारले आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमाक्षेत्र घटक धरून पीकविमा योजना राबविण्यात येणार आहे. यात नुकसान भरपाईचे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून बंधनकारक नाही. सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तर निश्‍चित केले आहे. केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आधारे व तांत्रिक उत्पादना आधारे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहित धरून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. हंगामाच्या शेवटी त्या आधारे ती निश्‍चित केली जाणार आहे. दरम्यान, गतवर्षी एक रुपयात पीकविमा योजना सरकारने आणली होती. त्यावेळी अपेक्षेपेक्षा दहापट अर्ज जास्त आले होते. या पार्श्वभूमीवर आता बोगस अर्ज करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

खरिपासाठी पिकाला किती विमा सुरक्षा अन् हप्ता (रुपयांत)

  • पीक विमा संरक्षित रक्कम शेतकरी हिस्सा

  • ज्वारी २८१७५ ७०.४४ रूपये

  • बाजरी ३०५३८ ७६.३५ रूपये

  • मूग २८००० ७० रूपये

  • उडीद २५००० ५०० रूपये

  • तूर ३७२१८ ७४४.३६ रूपये

  • मका ३६००० ५४० रूपये

  • भुईमूग ३८०९८ ९५.२५ रूपये

  • सोयाबीन ५०००० १००० रूपये

  • कापूस ५१००० १२७.५० रूपये

  • कांदा ६८००० ६८० रूपये

...तर शेतकरी पाच वर्षे काळ्या यादीत

बोगस विमा अथवा महसूल दस्ताऐवजात फेरफार करून विमा भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्या शेतकऱ्याला पाच वर्षे काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत आवश्‍यक कागदपत्रांसह विमा रक्कम भरून अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com