

Fake medicines Marathi News : राज्यात विविध ठिकाणी आढळलेल्या बनावट औषधांच्या साठ्याच्या मागं कोल्हापूर कनेक्शन असल्याच उघड झालं आहे. कोल्हापुरातील एका कंपनीकडून हा औषध पुरवठा केला गेला होता. या कंपनीशी संबंधित एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून त्याला पोलिसांनी अटकही केल्याची माहिती मिळतेय. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.