esakal | कुटूंब नियोजन! चार वर्षांपासून अकरा लाख पुरुष वापरतात निरोध; तर महिलांची 'याला' पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Family planinig

चार वर्षांत 44 लाखांहून अधिक जोडप्यांनी धरली कुटूंब नियोजनाची वाट 
कुटूंब नियोजन काळाची गरज असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील चार वर्षांत 44 लाखांहून अधिक महिला व पुरुषांनी कुटूंब नियोजनाचा मार्ग अवलंबला आहे. त्यासाठी दर्जेदार तांबी, छाया ही गर्भनिरोधक गोळी तर अंतरा हे इंजेक्‍शन, निरोधचा वापर केला जात आहे. 
- डॉ. दिगंबर कानगुले, सहसंचालक, कुटूंब नियोजन, पुणे 

कुटूंब नियोजन! चार वर्षांपासून अकरा लाख पुरुष वापरतात निरोध; तर महिलांची 'याला' पसंती

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : राज्याची वाढती लोकसंख्या आटोक्‍यात आणण्यासाठी कुटूंब कल्याण विभाग सरसावला आहे. या विभागाच्या पुढाकारातून मागील वर्षी 12 लाख दोन हजार जोडप्यांनी, तर चार वर्षांत 44 लाख 57 हजार 343 जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची वाट धरली आहे. त्यामध्ये 16 लाख 39 हजार 793 महिला व पुरुषांनी नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. तर तीन लाख 378 महिला तांबी, गर्भनिरोधक अंतरा इंजेक्‍शन व छाया या गोळ्यांचा वापर करीत आहेत. दुसरीकडे तब्बल 10 लाख 86 हजार 553 पुरुष कुटूंब नियोजनासाठी निरोधचा वापर करतात, अशी माहिती राज्याच्या कुटूंब नियोजन विभागाने दिली. 


महाराष्ट्रातील प्रजनन दर मागील काही वर्षांपासून 1.7 वर स्थिरावला आहे. त्यामध्ये कुटूंब नियोजन विभागाचे मोठा वाटा राहिला असून त्यांनी कुटूंब नियोजनावर भर दिला आहे. अंतरा हे गर्भनिरोधक इंजेक्‍शन घेणाऱ्याच्या तुलनेत तोंडावाटे छाया ही गर्भनिरोधक गोळी घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढू लागल्याचे कुटूंब नियोजन विभागाकडून सांगण्यात आले. मागील चार वर्षांत (2016-17 पासून) राज्यातील 16 लाख 39 हजार 793 महिलांनी कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असून काही पुरुषांनीही नसबंदीची शस्त्रक्रिया केली आहे. तर 10 लाख 86 हजार 553 महिला तथा पुरुषांकडून निरोधचा वापर केला जात असून 16 लाख 84 हजार 365 महिला तांबीचा वापर करीत आहेत. तसेच 2017-18 पासून 45 हजार 680 महिला गर्भनिरोधक अंतरा इंजेक्‍शन घेतात, तर दोन लाख 54 हजार 698 महिला तोंडावाटे छाया या गर्भनिरोधक गोळीचा महिलांकडून वापर केला जात असल्याचेही कुटूंब कल्याण विभागाने सांगितले. कुटूंब नियोजनात पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक हे जिल्हे आघाडीवर असून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील सर्वाधिक महिलांनी कुटूंब नियोजनाची वाट धरल्याचेही सांगण्यात आले. 

चार वर्षांत 44 लाखांहून अधिक जोडप्यांनी धरली कुटूंब नियोजनाची वाट 
कुटूंब नियोजन काळाची गरज असून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील चार वर्षांत 44 लाखांहून अधिक महिला व पुरुषांनी कुटूंब नियोजनाचा मार्ग अवलंबला आहे. त्यासाठी दर्जेदार तांबी, छाया ही गर्भनिरोधक गोळी तर अंतरा हे इंजेक्‍शन, निरोधचा वापर केला जात आहे. 
- डॉ. दिगंबर कानगुले, सहसंचालक, कुटूंब नियोजन, पुणे 


कुटूंब नियोजनाची स्थिती (2019-20) 
कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया 
3,66,205 
निरोधचा वापर 
2,54,325 
तांबी वापरुन नियोजन 
4,02,942 
गर्भनिरोधक अंतरा इंजेक्‍शनचा वापर 
29,854 
छाया या गोळीचा वापर 
1,48,377