esakal | 'बाबा, आम्ही करून दाखवलं!' रितेशचं भावनिक ट्विट : Election Result 2019
sakal

बोलून बातमी शोधा

Actor-Riteish-Deshmukh

लातूर शहरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांनी विजय मिळवले आहेत. अमित 42 हजारांनी विजयी हॅट्ट्रिक मिळवली आहे, तर धीरज यांनी 1 लाख 33 हजार मतांनी विजय मिळवत विरोधकांना चितपट केले आहे.

'बाबा, आम्ही करून दाखवलं!' रितेशचं भावनिक ट्विट : Election Result 2019

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

विधानसभा निवडणूक 2019 च्या गुरुवारी (ता.24) जाहीर झालेल्या निकालामुळे महाराष्ट्रात सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानेही जबरदस्त मुसंडी मारली असून यावेळी 44 जागांवर विजय मिळविले आहेत. काँग्रेससोबतचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या आहेत. या महाआघाडीच्या दोन्ही प्रमुख पक्षांनी महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. 

- पवारांना टार्गेट करण्याचा डाव भाजपच्या अंगलट | Vidhan Sabha 2019 Results

मराठवाड्यातील प्रमुख लढतींपैकी एक असणाऱ्या लातूर विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देखमुख यांच्या दोन्ही सुपुत्रांनी विजय प्राप्त केले आहेत. त्यांच्या प्रचारामध्ये सिंहाचा वाटा उचललेल्या अभिनेता रितेश देशमुखने आपल्या दोन्ही भावांच्या विजयानंतर एक भावनिक ट्विट केले आहे. त्याने ट्विटरवर पोस्ट केली असून त्यामध्ये 'बाबा आम्ही करून दाखवलं!' असं म्हटलं आहे. 

- ताकदीने न लढलेला काँग्रेस

लातूर शहरमधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांनी विजय मिळवले आहेत. अमित 42 हजारांनी विजयी हॅट्ट्रिक मिळवली आहे, तर धीरज यांनी 1 लाख 33 हजार मतांनी विजय मिळवत विरोधकांना चितपट केले आहे. अमित आणि धीरज यांनी अनुक्रमे भाजपचे शैलेश लाहोटी आणि शिवसेनेचे सचिन देशमुख यांचा पराभव केला. 

- हा विजय उद्याच्या काँग्रेसचा आहे; युवक काँग्रेसचा आहे!

गेल्या काही दिवसांपासून आपल्या दोन्ही बंधूंसाठी अभिनेता रितेश आणि जेनेलिया देशमुख या दांपत्याने लातूर जिल्हा पिंजून काढला होता. आपल्या भाषणांमधून तरुणांच्या हृदयात हात घालत रितेश देशमुखांनी आपल्या दोन्ही भावांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे या विजयाचे श्रेय रितेशला देखील जाते.

दोन्ही भाऊ विजयी झाल्यामुळे आनंदी झालेल्या रितेशने आपल्या वडिलांना विलासरावांना उद्देशून एक भावनिक ट्विट केलं आहे. तसेच लातूरच्या जनतेचे आभारही मानले आहेत. रितेशच्या या ट्विटची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे.