Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! महाराष्ट्रातील ३८ रक्तपेढ्यांवर एफडीएची कारवाई, ३४ परवाने निलंबित

FDA Action On Blood Bank: एफडीएने महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ३४ संस्थांचे परवाने निलंबित करण्यात आले असून चार संस्थांचे परवाने रद्द करण्यात आले.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

मुंबई : राज्यभरात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, एफडीएने रक्त साठवणूक केंद्रांविरुद्ध एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३८ संस्थांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३४ परवाने निलंबित करण्यात आले असून चार कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com