esakal | खडसेंच्या पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला हे ऐकून वाईट वाटलं - अंजली दमानिया | Anjali damania
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse Anjali Damania

खडसेंच्या पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला हे ऐकून वाईट वाटलं - अंजली दमानिया

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: पुण्याच्या भोसरी जमीन घोटाळा (Bhosri land Scam) प्रकरणात ईडीने सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखलं केलं आहे. "आज कोर्टाने एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini khadse) यांचा जामीन (bail) अर्ज फेटाळला. याबाबत मला वाईट वाटलं. कारण कर्ते करविते कोण आहेत आणि भोगायला कोणाला लागतंय?" अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली.

"एकनाथ खडसे यांनी जे काम केलं, त्याचे परिणाम त्यांचा जावई आणि पत्नीला भोगावे लागत आहेत. पण यातून मार्ग नक्कीच निघेल भ्रष्टाचार थोड्याच दिवसात पुढे येईल" असे अंजली दमानिया म्हणाल्या.

हेही वाचा: धोनीची वादग्रस्त निवड; BCCI सचिव जय शाह यांचा षटकार

"एकनाथ खडसे रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. पण हे नेते चौकशी पासून पळ काढण्यासाठी तब्येतीचा बहाणा सांगतात. सत्य लवकर समोर येईल" असे अंजली दमानिया म्हणाल्या.

loading image
go to top