नवाब मलिक यांच्याविरोधात FIR; क्रूझ पार्टी प्रकरण चिघळणार

समीर वानखेडे यांच्या बहिणीने राष्ट्रीय महिला आयोगाकडे घेतली धाव
Nawab-Malik
Nawab-Maliksakal media
Updated on

नवी दिल्ली : नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता मलिक यांच्याविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी याबाबत पोलिसांत धाव घेतली असून समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरनं याबाबत माहिती दिली. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडं धाव

एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं असून आपल्या संविधानिक हक्कांचं संरक्षण व्हावं अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर देखल करण्यासाठी तक्रार दिली आहे.

मलिकांविरोधात एफआयआर - क्रांती रेडकर

दरम्यान, समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनेही नवाब मलिक यांच्यावर एफआय़आर दाखल केल्याची माहिती दिली होती. तिनं म्हटलं की, "आमचे खासगी फोटो शेअर करुन नवाब मलिक आपल्या संविधानिक शपथेच्या विरोधात वागत आहेत. आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यांच्याविरोधात आम्ही एफआयआर दाखल केली आहे. सध्या मलिक यांचा समीर वानखेडे यांना पदावरुन हटवणं हा एकच अजेंडा आहे, कारण त्यांना त्यांच्या जावयाला वाचवायचं आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com