कोरोनाचे पहिल्या टप्प्यात लागतील दीड कोटी डोस ! केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांची महाराष्ट्राला प्रतीक्षा

1WhatsApp_20Image_202020_08_21_20at_203.26.52_20PM.jpeg
1WhatsApp_20Image_202020_08_21_20at_203.26.52_20PM.jpeg

सोलापूर : कोरोनावरील लस सुरवातीला कोणाला द्यायची, लस साठवायची कशी, लस टोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण तर रुग्णांमध्ये जनजागृती करण्याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. तरीही कोरोनाच्या संकटापासून नागरिकांना दूर ठेवण्यात मोठा वाटा असलेल्या फ्रंट लाईनवरील आरोग्य कर्मचारी, पोलिस यांच्यासह कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरणाऱ्या हायरिस्क व 60 वर्षांवरील को- मॉर्बिड रुग्णांना पहिल्या टप्प्यात लस द्यावी लागेल. अशांची संख्या राज्यात दिड कोटींपर्यंत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.


राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगर आणि नागपूर या जिल्ह्यांमधील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या साडेसहा हजारांपासून ते 30 हजारांपर्यंत आहे. तर सिंधुदूर्ग, नंदूरबार, धुळे, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, वर्धा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमधील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांपेक्षा कमी झाली आहे. राज्यातील मृतांच्या संख्येने 42 हजारांचा टप्पा ओलांडला असून त्यात को-मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरले आहेत. आतापर्यंत राज्यातील 15 लाख 90 हजारांहून अधिक व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील साडेतेरा लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत राज्यभरात पावणेदोन लाखांपर्यंत ऍक्‍टिव्ह रुग्ण असून त्यात 70 टक्‍क्‍यांपर्यंत रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. मात्र, कोरोनाच्या संदर्भात अद्यापही संशोधन सुरुच असून त्यात म्हणावे तितके यश मिळालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर लस हाच अंतिम पर्याय असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लशीची मागणी कळविली जाईल, असेही आरोग्य विभागाने सांगण्यात आले. 


चार गटांना मिळेल पहिल्यांदा लस; केंद्राच्या मार्गदर्शनानुसार नियोजन
नागरिकांकडून मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ लागल्याने राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, तापमान कमी झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा केव्हाही वाढू शकतो, असा सावधानतेचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे लस हाच कोरोनावरील अंतिम उपाय ठरू शकेल. त्यानुसार फ्रंट लाईनवरील आरोग्य कर्मचारी, पोलिस, हायरिस्क व 60 वर्षांवरील रुग्णांना लस द्यावी लागेल. परंतु, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधितांपर्यंत लस पोहचविली जाईल. 
- अर्चना पाटील, संचालक, सार्वजनिक आरोग्य


राज्याची स्थिती
अंदाजित एकूण लोकसंख्या
12.23 कोटी
60 वर्षांवरील नागरिक
97.39 लाख
हायरिस्क रुग्ण
9.83 लाख
पोलिस, आरोग्य कर्मचारी
21 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com