कऱ्हाड पालिकेनं पुन्हा करुन दाखवलं! स्वच्छ सर्वेक्षणात देशातील पश्चिम विभागात 'कऱ्हाड' ठरलं अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Municipality

स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये कऱ्हाड पालिकेनं पश्चिम विभागातील पालिकांमध्ये स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक पटकवलाय.

स्वच्छ सर्वेक्षणात देशातील पश्चिम विभागात 'कऱ्हाड' ठरलं अव्वल

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये (Clean Survey 2021) कऱ्हाड पालिकेनं (Karad Municipality) पश्चिम विभागातील (West Division) पालिकांमध्ये स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक पटकवला. कचरा मुक्त शहराचे थ्री स्टार रेटिंगचे पारितोषिकही पटकावले आहे. मात्र, देश पातळीवरील हॅटट्रिक हुकली आहे. 

कऱ्हाडनं 2019 व 2020 मध्ये देशपातळीवर पहिला क्रमांक पटकावणाऱ्या कराड नगरपालिकेनं पश्चिम विभागातील प्रथम क्रमांकाचं शहराचं पारितोषिक पटकावलं आहे. तसेच कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकनहा पटकावलं आहे. नवी दिल्ली येथे विज्ञान भवनाा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी (Minister Hardeep Singh Puri) यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण आज झाले. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde), आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नोडल ऑफिसर रफिक भालदार, अभियंता एस. आर. पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. 

हेही वाचा: शरद पवारांच्या एन्ट्रीमुळे आमदार शिंदेंची कोंडी फुटणार?

पालिकेनं 2019 व 2020 या दोन वर्षात पश्चिम विभागात देशपातळीवर पहिला क्रमांक मिळवला होता. या वर्षी हॅटट्रिक हुकली. लहान शहरांमध्ये विटा पालिकेनं देश पातळीवर पहिला क्रमांक पटकावला, तर कऱ्हाड सहाव्या क्रमांकावर आहे. मात्र, पश्चिम विभागातील स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविण्यात पालिका यशस्वी झाली. कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकनाचे पारितोषिक पालिकेनं मिळवलंय. हागणदारीमुक्त शहराचे आओडीएफ प्लस, प्लस मानांकनही  पालिकेनं मिळवले असून यावर्षी या स्पर्धेंतर्गत पालिकेच्या कामगिरीची दखल घेत प्रेरक दौंड सन्मान पालिकेस मिळाला आहे. सन्मानाच्या गोल्ड क‌‌टेगरीत पालिकेचा समावेश आहे.

हेही वाचा: महानायक अमिताभच्या 'कौन बनेगा करोडपती'त 'भोंदूगिरी'

loading image
go to top