esakal | राज्यातील पाच हजार पक्ष्यांचे होणार टॅगिंग
sakal

बोलून बातमी शोधा

पक्ष्यांचे होणार टॅगिंग

राज्यातील पाच हजार पक्ष्यांचे होणार टॅगिंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- जितेंद्र विसपुते

औरंगाबाद : भारतात ३७० प्रजातींचे पक्षी हंगामी स्थलांतर करतात. पैकी बरेच पक्षी महाराष्ट्रात येत असताता. या पक्ष्यांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी, भविष्यकालीन धोरण तयार करता यावे यासाठी राज्य वन विभागाने पावले उचलली आहेत. बीएनएचएस (द बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) या संस्थेच्या अंतर्गत राज्यातील ६ प्रमुख पाणथळ भागांत (जलाशय) निवडक संबंधित पक्ष्यांच्या ५००० प्रजातींना रिंगिंग आणि कलर फ्लॅगिंग (टॅगिंग) केले जाणार आहे. विशेष म्हणजे या पाणथळांत औरंगाबाद जिल्ह्यातील जयाकवाडी पक्षी अभयारण्याचा देखील समावेश करण्यात आलेला असून येथे ५०० पक्ष्यांचे टॅगिंग होणार आहे.

हेही वाचा: अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका;पाहा व्हिडिओ

भारतात पूर्व आशियाई -ऑस्ट्रेलिया, आशियाई पूर्व आफ्रिका आणि मध्य आशियाई प्रवासमार्गे जवळपास ३७० प्रजातींचे पक्षी दरवर्षी स्थलांतर करतात. पैकी ३१० प्रजातीचे पक्षी पाणथळ भागात स्थिरावतात. पैकी १७१ प्रजाती या पाणथळ आहेत. वर्ष २०१८ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धन आणि विकासाकरिता राष्ट्रीय कृती आराखडा जाहीर केला. त्याअंतर्गत मध्य आशियायी प्रवासमार्गे भारतात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी सन २०२३ पर्यंत करायच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या कृती आराखड्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे.

हेही वाचा: देशमुख, परबांनंतर तिसऱ्या 'अनिल'च्या शोधात पुण्यात

मराठवाड्याची शान असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय रामसर दर्जासाठी प्रस्ताव पाठविल्या गेलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यातही याअंतर्गत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान कृती आराखड्यात पक्ष्यांच्या स्थलांतराची शास्त्रीय माहिती संकलित करण्यासाठी बर्ड रिंगिंग आणि कलर फ्लॅगिंग करण्याबाबतही सूचित करण्यात आली आहे. याबाबत आजपर्यंत महाराष्ट्रात हालचाल नव्हती. नुकतीच राज्य वन विभागाने बीएनएचएस या संस्थेला राज्यातील ६ पाणथळांवर काही निवडक पक्षी प्रजातींच्या ५००० पक्ष्यांना रिंगिंग आणि कलर फ्लॅगिंग करण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचा: महाराष्ट्र सदनप्रकरणी भुजबळांना दिलासा !;पाहा व्हिडिओ

त्यानुसार जायकवाडी पक्षी अभयारण्य (औरंगाबाद), गंगापूर धरण, नांदूर मधमेश्वर अभयारण्य (नाशिक), हतनूर धरण (भुसावळ, जळगाव) , इसापूर धरण (हिंगोली-यवतमाळ), उजनी धरण (सोलापूर) येथे १ सेप्टेंबर २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत रिंगिंग आणि कलर फ्लॅगिंग हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. रिंगिंग आणि कलर फ्लॅगिंग केल्यानंतर संबंधित पक्षी कुठून कसे स्थलांतर करतो ते ध्यानात येईल. त्यांची माहिती संकलित झाल्यानंतर शासनाला पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना, धोरणे आखताना या माहितीचा उपयोग होईल. पाणथळपक्षी, कुरव, सुरय, क्रोंच, करकोचा, बदके, राजहंस, फ्लेमिंगो, झुडपी पक्षी, भारीट, मैना, वटवट्या, माशीमार, चंडोल, तीर चिमणी, गप्पीदास, कोकीळ या कुटुंबातील पक्ष्यांचे रिंगिंग आणि कलर फ्लॅगिंग होणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे यांना दिली.

हेही वाचा: छगन भुजबळ निर्दोष मुक्तता : अंजली दमानीयांचं आव्हान!

"रिंगिंग आणि कलर फ्लॅगिंगसह आमची टीम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देईल. पक्ष्यांचे मार्ग या कार्यक्रमामुळे निश्चित होतील. शिवाय आम्ही ४० वर्षांपूर्वीचा डेटा देखील अभ्यासणार आहोत. यातून पक्षी अधिवासात कसा बदल झाला ते पहिले जाईल. पक्ष्यांचे भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी काय आवश्यक आहे याचाही कृती कार्यक्रम तयार करणार आहोत. तसेच संबंधित पाणथळांवरील पाण्याचा दर्जाही तपासाला जाणार आहे."

-डॉ. सत्यसेलवम, सहायक संचालक, वेटलॅण्ड प्रोग्राम, बीएनएचएस, तामिळनाडू

"पक्षी स्थलांतराची शास्त्रीय माहिती यामुळे संकलित होणार असून याचा वन विभागाला धोरणे आखताना निश्चितच उपयोग होईल. पाणथळ आणि झुडपी पक्ष्यांचा भ्रमण मार्ग

आणि अधिवास याबद्दलची माहिती देखील अद्ययावत होईल."

-अतींद्र कट्टी,मानद वन्यजीव रक्षक

"बीएनएचएस आणि वन विभाग यांच्या विद्यमाने बर्ड रिंगिंग आणि कलर फ्लॅगिंग कार्यक्रम हाती घेण्यात आला असून याबाबत नुकतीच बीएनएचएसला परवानगी दिलेली आहे. काही निवडक पक्ष्यांच्या पायाला, पंखाला याअंतर्गत टॅग लावले जातील. जेणेकरून त्यांच्या स्थलांतराची माहिती संकलित करता येईल. जायकवाडीत देखील पक्ष्यांना टॅग लावले जाणार आहेत."

-डी.डी. सातपुते, विभागीय वन अधिकारी, वन्यजीव विभाग, औरंगाबाद

loading image
go to top