देशमुख, परबांनंतर तिसऱ्या 'अनिल'च्या शोधात पुण्यात

Kirit Somaiya
Kirit Somaiyaesakal

अनिल देशमुख, अनिल परबांनंतर मी तिसऱ्या अनिलच्या शोधात पुण्यात आलोय, असं सांगत भाजपाचे किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केलीय. शरद पवार भावना गवळींना पाठिशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. बजरंग खरमाटेंच्या 40 कोटीच्या मालमत्तांची यादीही मी ईडी व इनकम टॅक्स आफिसकडे दिली असून साताऱ्यातील जरंडेश्वर कारखानाप्रकरणावरही त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.

Summary

आता ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा घोटळा मी समोर आणणार आहे.

अनिल परबांचा रिसॉर्ट अनधिकृत असून याबाबत याचिका दाखल केलीय. आता तिसऱ्या अनिलचा लवकरच उलगडा होणार आहे. अजित पवारांच्या नातेवाईकाचा कारखाना असलेल्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्याने ६५ कोटी घेतले, त्याचं कर्ज ७०० कोटी घेतलं गेलंय. इंजिनिअर वैभव शिंदे (सातारा-कोरेगाव) यांचं काम पाहतोय, त्याचा आम्हा शोध घेतोय. शरद पवारांनी ७ कोटी घेणाऱ्या भावना गवळींना पाठिशी घालणं बंद करावं, असा सल्ला वजा इशाराही त्यांनी दिला.

Kirit Somaiya
पत्रकारांनी 'दहशतवादी' म्हणणं बंद करावं, अन्यथा..

बजरंग खरमाटेंच्या ४० कोटींच्या मालमत्तांची यादी मी इडीकडे दिली असून पुढील दोन-तीन दिवस कारवाई अपेक्षित आहे. आता ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा घोटळा मी समोर आणणार आहे. शरद पवार म्हणतात, निर्दोष नेत्यांवर ईडी कारवाई का करतेय? असा सवाल उपस्थित करत आहेत. यावर भाजपाच्या सोमय्या यांनी भावना गवळींनी (Bhavana Gawali) केंद्रासह राज्य सरकारचे ४४ कोटी बुडवले, असल्याचा आरोप केलाय. पवारांचे दोन्ही नेते खुलेआम चोरी करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, असं वाटतं असलं, तरी त्यांचा तो भ्रम असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Kirit Somaiya
साताऱ्यात राजे समर्थकांत तुफान 'राडा'; सहाजण गंभीर, 16 जणांवर गुन्हा

केंद्रातील भाजपा सरकारने ईडीचा राजकीय साधन म्हणून वापर सुरू केला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीकडून विनाकारण त्रास देण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भावना गवळींचे समर्थन केले होता. यावर भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पवारांना टोमणाही मारला. ‘शरद पवार यांनी भावना गवळींना विचारावे की, कपाटातून जे सात कोटी चोरीला गेले ते कुठून आले होते?’ असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. आज पुन्हा त्यांनी शरद पवारांवर पुण्यात निशाणा साधलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com