Nagpur Medical College 10 Robotic Surgeries
ESakal
महाराष्ट्र बातम्या
Nagpur: भारतात रोबोटिक सर्जरीची क्रांती! पहिल्यांदाच एकाच वेळी १० शस्त्रक्रिया LIVE; नागपूर मेडिकल कॉलेज रोबोटिक हब बनले
Nagpur Medical College 10 Robotic Surgeries Live: एकाच वेळी १० रोबोटिक ऑपरेशन करण्याचा विक्रम करण्यात आला आहे. जीएमसी नागपूर देशाचे ‘रोबोटिक सर्जिकल पॉवरहाऊस’ बनले आहे.
नागपूर : नागपूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथील जनरल सर्जरी विभागाने डीन डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक कार्यक्रम 'रोबोसर्ज'२५' आयोजित केला. हा कार्यक्रम मध्य भारतासाठी रोबोटिक आणि कमीत कमी आक्रमक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा होता.

