Uddhav Thackeray: हजारेक कोटींचा घोटाळा असेल तर ये .. ! भ्रष्टाचाऱ्यांना गोमूत्र शिंपडून केलं जातं स्वच्छ

Uddhav Thackerey :त्यांना काय गोमूत्र शिंपडून स्वच्छ केलं होतं का, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल.
LIVE Marathi News Updates
LIVE Marathi News UpdatesEsakal

Uddhav Thackeray in Amaravati: सध्या उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी त्यांनी अमरावती येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांना मंत्रिपद दिल्यावरुन भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्या काही आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. एवढे आरोप करुनही अजित पवार, छगन भुजबळ या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिल्याने, उद्धव ठाकरेंनी चांगलीच खरडपट्टी काढली.

अमरावती या ठिकाणी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. भारतीय जनता पक्षाने ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याच नेत्यांना सरकारमध्ये सामील केलं.(Latest Marathi News)

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "भारतीय जनता पक्षाने या नेत्यांवर केलेले आरोप खोटे होते किंवा केवळ आणि केवळ तुमच्या पक्षात आले आणि गोमूत्र शिंपडून स्वच्छ झाले. हे तरी सांगा आम्हाला. काय शिंपडताय त्यांच्यावर? गोमूत्र शिंपडताय का? का चौकश्या थांबल्या त्यांच्या"

LIVE Marathi News Updates
Sanjay Raut:"बाई परत लोकसभेत जातील ? त्यांना बजरंग बली धडा शिकवणार.." संजय राऊत कडाडले

यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षात येण्यासाठी हजारो कोटींच्या घोटाळ्याचा निकष असल्याचे भाष्य केले. ते म्हणाले की, "भाजपमध्ये लहान घोटाळा चालणार नाही, हजारेक कोटींचा घोटाळा असेल तर ये तुला मोठं पद देतो."(Latest Marathi News)

अमरावतीमधील या सभेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप केले. ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांवर ७०,००० कोटींच्या घोटाळे, बॅंकाचे घोटाळ्याचे आरोप केले, आज त्यांच्याच फोटोखाली फोटो लावताय, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले.

LIVE Marathi News Updates
Uddhav Thackeray : त्रिशुळ कसला, हे सरकार एक फुल दोन हाफ! उद्धव ठाकरेंचा दिग्रसमधून जोरदार हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com