सत्तेत बसल्यानंतर पुराव्याची गाडीच गायब: राजू शेट्टींचा भाजपला खणखणीत टोला

Former MP Raju Shetty, president of Swabhimani Shetkari Sanghatana press conference kolhapurFormer MP Raju Shetty, president of Swabhimani Shetkari Sanghatana press conference kolhapur
Former MP Raju Shetty, president of Swabhimani Shetkari Sanghatana press conference kolhapurFormer MP Raju Shetty, president of Swabhimani Shetkari Sanghatana press conference kolhapur

कोल्हापूर: शेतकरी आंदोलनात सरकार फसले आहे. आता प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या आंदोलनाला जातीय, राजकीय रंग दिले जात आहेत. मात्र संपूर्ण देश या आंदोलनाला पाठिंबा देत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा संयम संपण्यापूर्वी सरकारने यावर निर्णय घ्यावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केले.

फडणवीस भ्रष्टाचाराची पुस्तिका काढणार असल्याचे सांगण्यात येत आहे, यावर बोलताना शेट्टी म्हणाले, असे झाले तर जनतेच्या ज्ञानात भर पडेल. पूर्वीही गाडीभर पुरावा देण्याची घोषणा केली होती. मात्र सत्तेत बसल्यानंतर गाडीच गायब झाली. त्यामुळे इकडे बोलायचे आणि दिल्लीत शेतकऱ्यांना खंदक काढून आ डवायचे ही कोठली पद्धत? अशी विचारणा शेट्टी यांनी फडणवीस यांना केली.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com