Rajan Patil: 'लग्नाआधी पोरं जन्माला घालणाऱ्यांचा अभिमान'; राष्ट्रवादीचा माजी आमदार बरळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajan Patil

Rajan Patil: 'लग्नाआधी पोरं जन्माला घालणाऱ्यांचा अभिमान'; राष्ट्रवादीचा माजी आमदार बरळला

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या वेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राजन पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महिला वर्गातून मोठा संताप व्यक्त होत आहे. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या वेळी राजन पाटील म्हणाले की, पाटलांच्या पोरांना बाळ म्हणता अरे लग्नाआधी पाटलांच्या पोराला तुमच्याइतकं पोरं असतात आणि लग्नाआधी पोरं जन्माला घालणाऱ्यांचा मला अभिमान आहे असं पाटील बोलताना म्हणाले आहेत.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या वेळी राजन पाटील म्हणाले की, गेली आठ दिवस झाले दुसरी काही भानगडचं नाही. तसं तुम्ही आज आलात. निवडणूक भीमा कारखान्याची आहे की, राजन पाटलांच्या कुटुंबाची हेच कळायला मार्ग नाही. आमच्या पोराला बाळ म्हणतात. अरे आम्ही पाटील आहोत. याला माहितीचं नाही. पाटलांच्या पोरांना लग्नाच्याही आधी तुमच्याएवढी बाळ असतात आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे.

हेही वाचा: मुंबईत भररस्त्यात 'हॅटमॅन'कडून महिलेचा खून; Viral Videoवर पोलिसांचे स्पष्टीकरण

त्याचबरोबर पुढं बोलताना पाटील म्हणाले की, वयाच्या 17 व्या वर्षी 300 यानी 200 कलमं भोगणारी आमची पोरं आहेत. त्याचबरोबर कलम 302च्या गुन्ह्यांचा गर्व वाटतो असंही ते म्हणालेत. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचबरोबर महिला वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics: कीर्तीकर पिता-पुत्रात 'फाळणी'; वडील शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात

टॅग्स :NCPMLA