रश्मी शुक्ला कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर हजर राहणार? | Rashmi shukla | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi shukla

रश्मी शुक्ला कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर आज हजर राहणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरेगाव-भीमा (Koregaon Bhima) येथील दंगल प्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi shukla) यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर दोन दिवस साक्ष होणार आहे. मुंबईत सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये आज आणि उद्या त्यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी माजी न्यायाधीश जे . एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

रश्मी शुक्ला चौकशीला येण्याची शक्यता आहे. हिंसाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या न्यायमूर्ती जे. एन. पटेल आयोगानं रश्मी शुकला यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. या चौकशीला रश्मी शुक्ला या हजर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त असताना ही हिंसा घडली होती. यावेळी परमबीर सिंह कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.

loading image
go to top