Karnataka CM: शिंदे पोहचले दिल्लीत! ठरवणार सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमारांचं भवितव्य

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत
Karnataka CM
Karnataka CMEsakal

कर्नाटक विधानसभेच्या १३६ जागा जिंकत काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी केली. विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळाल्यानंतर कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. सुशील कुमार शिंदे सध्या दिल्लीत पोहचले असून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचं भवितव्य ते ठरवणार आहेत.

तेथील तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे. यामध्ये सरचिटणीस जितेंद्र सिंह, दीपक बाबारिया यांचा समावेश आहे.

Karnataka CM
Akola Violence: महाराष्ट्रात दंगली उसळण्यावर देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, म्हणाले...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला पक्षाने निरीक्षक म्हणून नेमल्याचे सांगितले आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडीपर्यंत शिंदे आता बंगळूरमध्ये ठाण मांडून असणार आहेत. रविवारी (ता. १४) ते ‘चार्टर प्लेन’ने सोलापुरातून बंगळूरला रवाना झाले.

Karnataka CM
Mallikarjun Kharge : कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळवून देणारे खर्गे अडचणीत! कोर्टाने पाठवलं समन्स

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडविण्याची मोठी जबाबदारी काँग्रेसने शिंदेंवर सोपविली असून त्यांच्या सोबतीला इतर दोन सहनिरीक्षक देखील आहेत. कर्नाटकात आता सत्तास्थापनेला वेग आला असून नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईपर्यंत शिंदेंची भूमिका निर्णायक असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com