VIDEO : महाराष्ट्राची संस्कृती पाहून भारावले G20 प्रतिनिधी; गिरगाव चौपाटीवर भन्नाट डान्सनं वेधलं लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girgaon Chowpatty

मुंबईतील कुलाब्याजवळ G-20 प्रतिनिधींचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

VIDEO : महाराष्ट्राची संस्कृती पाहून भारावले G20 प्रतिनिधी; गिरगाव चौपाटीवर भन्नाट डान्सनं वेधलं लक्ष

मुंबई : G20 परिषदेसाठी राज्य सरकारनं तयारीचा वेग वाढविला आहे. दरम्यान, 16 डिसेंबरपासून मुंबईतील बिकेसी (BKC Center) सेंटर इथं या बैठकीला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कालपासून जी 20 परिषदेच्या बैठकांना सुरूवात झालीय.

काल (मंगळवार) मुंबईतील कुलाब्याजवळ G-20 प्रतिनिधींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी भारतात दाखल झालेल्या G-20 च्या प्रतिनिधींनी गिरगाव चौपाटीवर लोकनृत्य कलाकरांसोबत डान्स सादर केला. एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये राजदूत पारंपरिक महाराष्ट्रीयन संगीतावर नाचताना दिसत आहेत.

G-20 प्रतिनिधी गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यावर लावणी, कोळी गीत आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. व्हिडिओमध्ये G20 प्रतिनिधी लोकनृत्य कलाकरांसोबत महाराष्ट्रीयन गाण्यांच्या तालावर नाचताना दिसत आहेत. मंगळवारी रात्री ANI नं हा व्हिडिओ पोस्ट केला आणि तेव्हापासून त्याला 25k पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 2k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा: India-China Clashed : चीनविरोधात अमेरिकेची आक्रमक भूमिका; म्हणालं, भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही..

राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृतीचं दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणूकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील परदेशी पाहुण्यांना करून दिली जाणार आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून त्यातील आठ बैठका मुंबईत पार पडणार आहेत. त्याशिवाय पुण्यात 4 तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. दरम्यान, राजदूतांसाठी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडविणारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे शिष्टमंडळ एलिफंटा लेणी, आगाखान पॅलेस, शनिवार वाडा आणि शिवनेरी किल्ल्याला भेट देणार आहे.

हेही वाचा: Bhima Koregaon Case : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाला नवं वळण; अमेरिकन फर्मनं केला खळबळजनक दावा!

भारतानं 1 डिसेंबर रोजी G-20 चं अध्यक्षपद स्वीकारलं. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 च्या भारताच्या अध्यक्षपदासाठी लोगो, थीम आणि वेबसाइटचं अनावरण केलं. भारताव्यतिरिक्त G20 मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Jayant Patil : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देण्यास शिंदे-फडणवीस घाबरताहेत; जयंत पाटलांचा आरोप

काय आहे G20?

डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप G20 असं म्हणतात. त्याची स्थापना 1999 साली झाली. युरोपियन युनियन आणि 19 देशांचा अनौपचारिक गट आहे. त्याचे नेते दरवर्षी G20 शिखर परिषदेत एकत्र येतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे कसे आणायचे यावर चर्चा करतात.