कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देण्यास शिंदे-फडणवीस घाबरताहेत; जयंत पाटलांचा आरोप I Jayant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra-Karnataka Border Dispute Jayant Patil

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता चांगलाच उफाळून आला आहे.

Jayant Patil : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर देण्यास शिंदे-फडणवीस घाबरताहेत; जयंत पाटलांचा आरोप

सातारा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra-Karnataka Border Dispute) आता चांगलाच उफाळून आलाय. बेळगावच्या हिरे बागेवाडीजवळ कन्नड रक्षक वेदिका संघटनेकडून महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला.

या वादात आता राष्ट्रवादीनं (NCP) एन्ट्री केली असून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना (Basavaraj Bommai) प्रतिउत्तर देण्यास घाबरत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा: India-China Clashed : चीनविरोधात अमेरिकेची आक्रमक भूमिका; म्हणालं, भारताच्या सुरक्षेसाठी आम्ही..

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, 'येत्या काही दिवसांत कर्नाटक विधानसभा निवडणूक असल्यामुळं दिल्लीतून राज्य सरकारवर सीमाप्रश्‍नाबाबत बोलण्यास दबाव आणत आहे. कर्नाटक मुद्द्यावर राज्य सरकारला दिल्ली दरबारी जाण्यास उशीर झाला असून, याबाबत महाराष्ट्र सरकारची बोटचेपी भूमिका आहे.'

हेही वाचा: Bhima Koregaon Case : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाला नवं वळण; अमेरिकन फर्मनं केला खळबळजनक दावा!

हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांत गुंडाळण्याचं धोरण भाजपनं आखलं आहे. मात्र, राज्याचे प्रश्‍न मांडण्यासाठी महाविकास आघाडीनं तीन आठवडे अधिवेशन घेण्याची मागणी केलीय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बेळगावला जाऊन सीमाभागातील नागरिकांना धीर देण्याचं काम करत आहेत, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात असून या विरोधात मुंबईत महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा अभूतपूर्व होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.