माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद - गृहमंत्री | Dilip Walse Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dilip walse patil

माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद - गृहमंत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात (Gyarapatti forest) माओवाद्यांच्या (Naxalite) विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची (police action) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रशंसा केली आहे. "आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी (Home Minister) पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी (outstanding police job) ठरली आहे.

हेही वाचा: मुंबईत १७ हजार बोगस डॉक्टर्स ? बोगस डॉक्टरला रंगेहात पकडले

राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिस दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० दलाने मिळालेल्या माहितीआधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र विशेषतः गडचिरोली पोलिसांचे गृहमंत्र्यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.

या कारवाईत एल्गार परिषद हिसांचार प्रकरणी एनआयए आणि पुणे पोलिसांना वांटेड असलेला मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याचं वृत्त आहे. तेलतुंबडे सीपीआय (माओवादी)च्या केंद्रीय समितीचा सदस्य आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे त्याला दुजोरा दिला नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात माहिती येणे सुरु असल्यामुळे आताच अधिकृत बोलता येणार नसल्याचे सकाळशी बोलताना सांगीतले. सध्या ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह गडचिरोली इथे आणण्याची प्रक्रीया सुरु आहे. मृतदेहाची रितसर ओळख पटवली जाईल, त्यानंतर मिलिंद तेलतुंबडे आणि अन्य माओवादी कमांडर याच्या मृत्युसंदर्भात अधिकृत घोषणा होईल असे सुत्रांनी सांगीतले आहे.पोलिसांनी मिलिंद तेलतुंबडे याची माहिती देणाऱ्याला 50 लाखाचे बक्षीस जाहिर केले आहे.

loading image
go to top