Pune Ganesh Visarjan 2023 : पुण्यातल्या लक्ष्मी रस्त्यावर 'कथकली'नं गणेशभक्तांचे वेधले लक्ष

पुण्यातल्या गणरायाच्या विसर्जनाची साऱ्या राज्यभर जोरदार चर्चा होत आहे.
Ganesh Visarjan Festival 2023 Pune Laxmi Road Ganpati :
Ganesh Visarjan Festival 2023 Pune Laxmi Road Ganpati :esakal

Ganesh Visarjan Festival 2023 Pune Laxmi Road Ganpati : पुण्यातल्या गणरायाच्या विसर्जनाची साऱ्या राज्यभर जोरदार चर्चा होत आहे. त्यात सहभागी झालेले वेगवेगळे कलाकार यांनी गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. वादक, गायक याशिवाय नर्तक कलाकारांनी देखील उपस्थित गणेशभक्तांची उस्फुर्त दाद मिळवल्याचे दिसून आले आहे.(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरु असताना त्यातील सहभागी वेगवेगळ्या कलाकारांनी नागरिकांना थक्क केले आहे. त्यातील प्रणव या कथकली कलाकारानं उपस्थितांची मनं जिंकून घेतल्याचे दिसून आले. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये प्रणवनं कथकली सादर करून उपस्थितांची दाद मिळवली आहे. त्याला मिळालेला प्रतिसादही खूप काही सांगून जाणारा होता.

Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'

पुण्यातील गणेशोत्सव हा देशभरातील गणेशभक्तांसाठी, कलाकारांसाठी आणि हौशी पर्यटकांसाठी देखील उत्सुकतेचा विषय असतो. या गणेशोत्सवाचा आणि खासकरुन विसर्जन मिरवणूकीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण बाहेर देशातूनही येत असतात. अशावेळी विविध मंडळाकडून गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीची जय्यत तयारी केली जाते. त्यातील सहभागी ढोलपथकं, लेझीम अन् झांज पथके यांचीही जोरदार चर्चा होत असते.

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीत पहिल्यांदात आपली कला सादर करणाऱ्या प्रणवनं सांगितले की, मी मुळचा पुण्याचा असून भरतनाट्यममध्ये पुणे विद्यापीठातून एम.ए केले आहे. पहिल्यांदाच मला अशाप्रकारे सादरीकरण करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी खूपच भारावून गेलो आहे. कथकलीचे सादरीकरण गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये पहिल्यांदाच करता आले याचे विशेष अप्रुप आहे.

यंदाच्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये राष्ट्रीय कला अकादमीनं अलका चौकात काढलेल्या रांगोळीचे देखील मोठया प्रमाणावर कौतुक होताना दिसत आहे. अकादमीच्या वतीनं ज्या मार्गावरुन पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन होते अशा चार किलोमीटर मार्गावर रांगोळीच्या पायघड्याही काढल्या आहेत.त्याची चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com