गरबाप्रेमींनो, परवानगी तर मिळाली; मात्र 'हे' आहेत नियम

गरबाप्रेमींनो, परवानगी तर मिळाली; मात्र 'हे' आहेत नियम

मुंबई : राज्यात कोरोनाचं संकट अद्याप सरलेलं नाहीये. परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरीही कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकार अत्यंत खबरदारी घेऊनच पावले टाकत आहे. येत्या सण समारंभांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक नियम लादतच परवानगी दिली आहे. या ऑक्टोबर महिन्यात आता नवरात्र, दसरा हे सण आले आहेत. नवरात्रीमध्ये गरबा खेळता येईल की नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जर तुम्ही गरबाप्रेमी असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, राज्य सरकारने गरब्यास परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी काही नियमांसहित असणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गरबाप्रेमींनो, परवानगी तर मिळाली; मात्र 'हे' आहेत नियम
राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते; आशिष शेलारांचे सूचक वक्तव्य ! ; पाहा व्हिडिओ

काय आहेत गरब्यासाठीचे नियम

  • मुंबईमध्ये गरबा खेळण्यास परवानगी नाही

  • मुंबई वगळता राज्यभर गरबा खेळण्याची सरकारकडून परवानगी

  • आयोजकांचे आणि गरब्यात सहभागी होणाऱ्यांचे लशीचे दोन डोस पूर्ण झालेले असणे गरजेचे

  • गरब्याचे आयोजन बंद हॉलमध्ये करण्यात आलं असेल तर त्या हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्केच लोक असणे आवश्यक

  • मोकळ्या मैदानात आयोजन असेल तर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक

गरबाप्रेमींनो, परवानगी तर मिळाली; मात्र 'हे' आहेत नियम
देशविरोधी नारे दिले असतील, तर अटक का झाली नाही - कन्हैया कुमार

याबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय की, सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्याकडून गरब्याला मान्यता आहे. ती मान्यता असल्याकारणाने तीन पद्धतीने गरबा खेळता येईल. ओपनमध्ये, ऑडीटोरियममध्ये आणि बंद हॉलमध्ये... जर ओपन एअरमध्ये आयोजन असेल तर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क बंधनकारक असेल तर ऑडीटोरियमच्या 50 टक्केच लोकसंख्या असणं बंधनकारक असणार आहे. केटरिंग अथवा इतर सेवा देणाऱ्यांचे देखील दोन डोस पूर्ण होणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन राजेश टोपे यांनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com