

Political Storm After FIR on Munde's PA in Gauri Garje Case
Esakal
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. पत्नीच्या आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं १० महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. अनंत यांचे विवाहबाह्य संबंध असल्यानं पती-पत्नीत सतत भांडण व्हायचं आणि त्यात तणावातून गौरी पालवे गर्जे यांनी आयुष्य संपवलं असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केलाय.