esakal | घाटक्षेत्रात मुसळधार; दरडी कोसळण्याची शक्यता, सावधानतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

घाटक्षेत्रात मुसळधार; दरडी कोसळण्याची शक्यता, सावधानतेचा इशारा

घाटक्षेत्रात मुसळधार; दरडी कोसळण्याची शक्यता, सावधानतेचा इशारा

sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : काल बुधवारपासून हवामान खात्याच्या अंदाजानुसार (MID) राज्यभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. (maharashtra) पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, पुणे या प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणातील जिह्यातील नद्यांच्या पाणीपातळी वाढ झाली आहे. या परिसरात पूरपरिस्थिती (flood sistuation) निर्माण झाली आहे. (kolhapur rain update) दरम्यान येथे पूरस्थिती निर्माण झाल्याने NDFR ची पथके दाखल झाली आहेत. कोकण परिसरातील चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (konkan rain update) पावसाचे प्रमाण अधिक असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय माथेरान, खंडाळा, सातारा, महाबळेश्वर, पुणे रायगडमध्ये पुढचे तीन-चार तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही जोरदार सरी बरसतील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. मुंबई ठाण्यात ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता असणार आहे.

हेही वाचा: Konkan Railway - मुसळधारेमुळे तेसज आणि जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द

दरम्यान मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या घाट (maharashtra ghat section) क्षेत्रात अनेक ठिकाणी गेल्या 48 तासात 600 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊसाची नोंद झाली आहे. या परिसरात दरड कोसळणे, रस्ते खचणे अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत. या भागातील प्रशासनाने नागरिकांना स्थलांतराचे (migrate) आवाहन केले आहे. याशिवाय दरड प्रवण क्षेत्रातील गावांत नागरिकांनी तात्पुरते सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणारा भुईबावडा आणि करुळ घाटमार्ग पावसामुळ वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. फोंडा आणि आंबोली हे दोनच घाटमार्ग सध्या सुरु आहेत.

दरम्यान कोकणातील चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर झाला असून तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. इकडे कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन त्या दुथडी भरुन वाहत आहेत. या परिसरातील अनेक मार्गांवर पाणी आल्याने तसेत झाडे कोसळल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. बऱ्याच गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.

हेही वाचा: PHOTO - पावसाचं रौद्ररुप; चिपळूणात ढगफुटी, जनजीवन विस्कळीत

loading image