विकासासाठी भाजपने 'राष्ट्रवादी'ची साथ घेतली : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नगर : 'राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला आहे', अशा शब्दांत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगर महापालिकेतील घडामोडींचे समर्थन केले. नगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपने महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक जिंकली. या अनपेक्षित युतीमुळे शिवसेनेला धक्का बसला असून त्या पार्श्‍वभूमीवर महाजन यांनी भूमिका स्पष्ट केली. 

नगर : 'राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला आहे', अशा शब्दांत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नगर महापालिकेतील घडामोडींचे समर्थन केले.

aschim-maharashtra/bjp-asked-shripad-chindam-vote-shiv-sena-alleges-party-members-162820" target="_blank">नगर महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपने महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक जिंकली. या अनपेक्षित युतीमुळे शिवसेनेला धक्का बसला असून त्या पार्श्‍वभूमीवर महाजन यांनी भूमिका स्पष्ट केली. 

वादग्रस्त श्रीपाद छिंदमने या निवडणुकीत शिवसेनेला मतदान केल्याने शिवसैनिकांनी त्याला मारहाणही केली. 'छिंदमने शिवसेनेला मदत करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीनेच कट रचला', असा आरोप शिवसेनेने केला आहे. 

शिवसेनेही अनेक ठिकाणी काँग्रेसशी युती करत जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे.

गिरीश महाजन म्हणाले, "विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळेच आम्ही पाठिंबा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बसपा आणि इतरही काही पक्ष उमेदवारांनीही आम्हाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. निवडणुकीसाठीचे संख्याबळ जुळत असल्याने आम्ही हा पाठिंबा घेतला.'' 

भाजप-राष्ट्रवादीच्या अनपेक्षित युतीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या युतीवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पण गिरीश महाजन यांनी मात्र ही शक्‍यता फेटाळून लावली.

विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिला. त्यामुळेच आम्ही पाठिंबा घेतला.

'या स्थानिक निर्णयाचा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. शिवसेनेही अनेक ठिकाणी काँग्रेसशी युती करत जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्याचा राज्यपातळीवर परिणाम होत नाही. नगरमध्ये झालेली आघाडी स्थानिकच आहे. राज्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार नाही', असे महाजन म्हणाले.

Web Title: Girish Mahajan clarifies BJP stand on alliance with NCP