येत्या दिवसांत महाराष्ट्रातही बदल होईल; ५ राज्यांच्या निकालावरुन महाजनांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Mahajan

भाजप नेते गिरीश महाजन यांनी पाच राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना निकाल भाजपच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे.

येत्या दिवसांत महाराष्ट्रातही बदल होईल; ५ राज्यांच्या निकालावरुन महाजनांचा दावा

मुंबई - पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणीचे कल आता स्पष्ट होत आहेत. पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेसला धक्का बसला असून आम आदमी पक्षाला बहुमत मिळत असल्याचं दिसत आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पाच राज्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना निकाल भाजपच्या बाजूने असल्याचं म्हटलं आहे.

देश भाजपमय होत असून येत्या काही दिवसात महाराष्ट्रातही (Maharashtra) बदल होईल असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे. पाच राज्यापैकी चार राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय. पंजाब वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा: युपीत योगी'राज', पंजाबमध्ये 'आप'; वाचा पाच राज्यातील निकालाचे अपडेट्स

गिरीश महाजन यांनी त्यांच्याविरोधात खोट्या केसबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सरकारी वकील चव्हाण यांनी समोर यावे. आम्ही व्हिडिओ प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत आहोत. CCTV आहे मग रिकॉर्डिंग कुठून झाली असे कोण कसे बोलू शकेल. दूध का दूध पाणी का पाणी म्हणतात मग करा चौकशी असं आव्हानही राज्य सरकारला त्यांनी दिलं आहे.

राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अद्याप होऊ शकलेली नाही. यासंदर्भात महाविकास आघाडीनेे राज्यपालांकडे धाव घेतली होती. दरम्यान, यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक चुकीची असून यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.

Web Title: Girish Mahajan On Election Result 5 States Maharashtra Will See Change

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top