Gokul Dairy Election
esakal
गोकुळ दूध संघावर संचालक नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना गोकुळवर ताबा मिळवण्याचा कोणताही हेतू नसल्याचं सांगितलं होतं. वैधानिक पेच सोडवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. कोरमच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला काही सवाल उपस्थित केले आहेत.