
सोलापूर : मागील १० वर्षांत सोने तोळ्यामागे एक लाख रूपयाने महागले आहे. आजच्या एका तोळ्याच्या दरात ४५ वर्षापूर्वी (१९८०) किलोभर सोने विकत येत होते. १९८० साली १३०० रूपये प्रती तोळा दर होता. १९२५ साली १८ रूपये ७५ पैसे प्रती तोळा असलेले सोने १०० वर्षानंतर सर्वोच्च पातळीवर पोहचले आहे. सध्या सोन्याला प्रतितोळा एक लाख २९ हजार रूपये मोजावे लागत आहेत. विविध देशांकडून सोन्यातील वाढती गुंतवूणक व ग्राहकांनी सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे वळल्याचे अभ्यासक सांगतात. येत्या काळात सोन्याच्या दरातील ही तेजी अशीच राहणार असल्याचेही सराफा व्यापारी सांगत आहेत.
बरोबर १०० वर्षापूर्वी १९२५ साली एका तोळ्याचा दर (११ ग्रॅम) १९ रूपये ७५ पैसे होता. आता २०२५ साली त्याच सोन्याचे प्रतीतोळा (१० ग्रॅम) दर १ लाख २९ हजारावर पोहचले आहेत. विशेष म्हणजे मागील १० वर्षात २०१५ ते २०२५ या काळात सोन्याच्या दरातील वाढ विक्रमी आहे. २०१५ साली २६ हजारावर असलेले सोने आता त्यात १ लाख २ हजाराची वाढ होत १ लाख २९ हजारावर पोहचले आहे.
१९२५ साली सोन्याच्या तोळ्याचा दर १८ रूपये ७५ पैसे होता. तो एक हजारावर पोहचण्यासाठी ५५ वर्षे गेली. त्यानंतर २७ वर्षांत ९ हजारांची वाढ होत २००७ साली सोने प्रतितोळा १० हजारांवर पोहचले. यानंतर सोन्याच्या दरात वाढ होत राहिली. ८ वर्षांने म्हणजेच २०१५ साली सोने २५ हजार पार झाले. २०२२ साली ५० हजार पार तर पुढील तीन वर्षातच सोन्याच्या दराने एक लाखाचा टप्पा पार केला आणि सध्या दीड लाख रूपयांकडे दराची वाटचाल सुरू आहे.
१०० वर्षांतील सोन्याचा तोळ्याचा दर...
साल सोन्याचे दर
१९२५ १९.७५ रूपये
१९३५ ३०.८१ रूपये
१९४५ ६२.०० रूपये
१९५५ ७९.१८ रूपये
१९६५ ७१.७५ रूपये
१९७५ ५४० रूपये
१९८५ २१३० रूपये
१९९५ ४६८० रूपये
२००५ ७००० रूपये
२०१५ २६ हजार ३००
२०२५ १ लाख २९ हजार
दर वाढले तरी खरेदी वाढलेलीच
सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अधिक अवलंबून राहतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयामुळे मागील सहा महिन्यांपासून सोन्याच्या दरात तेजी दिसत आहे. भविष्यात काय स्थिती राहील, सांगता येत नाही. पण, सर्वच देशांकडून सोन्यातील गुंतवणूक वाढल्याचे आम्ही पाहत आहोत. मागील ३० ते ४० वर्षातील सोने खरेदीचा कल अधिक आहे. फरक इतकाच आहे की आधी सोन्याची खरेदी दागिन्यांसाठी होत होती आणि आता ती सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून केली जात आहे. दर वाढले तरी ग्राहक आता ५ ऐवजी २ तोळे खरेदी करतोच.
- विनय आपटे, आपटे ज्वेलर्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.