राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनाबाबत अखेर महामंडळाने काढले परिपत्रक

प्रशांत कांबळे
Saturday, 8 August 2020

ज्य सरकारने एसटीतील सवलतीच्या प्रतिपूर्तीच्या अंतर्गत 550 कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला केली आहे. दरम्यान ही रक्कम वेतनासाठीच वापरण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्यानंतर आता एसटी महामंडळाने या रकमेतून पावणे दोन महिन्याचे वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे वेतनापासून वंचित असलेल्या एसटी कामगारांना दिलासा देणयासाठी राज्य सरकारने मदतीचा हात दिला. त्यातून एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे थकित वेतन मिळणार असल्याची चर्चा होती. अखेर महामंडळाने पावणेदोन महिन्यांचे थकित वेतन देण्याबाबत परिपत्रक काढले आहे.

हातमागावरील वस्त्रांना प्रोत्साहन द्या; बॉलीवूड अभिनेत्रींनी केले महत्वपूर्ण आवाहन

राज्य सरकारने एसटीतील सवलतीच्या प्रतिपूर्तीच्या अंतर्गत 550 कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला केली आहे. दरम्यान ही रक्कम वेतनासाठीच वापरण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्यानंतर आता एसटी महामंडळाने या रकमेतून पावणे दोन महिन्याचे वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी राज्यातील सुमारे 18 विभागांमधील कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले आहे. सोमवारपर्यंत राज्यातील संपूर्ण 31 विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन दिल्या जाणार आहे. 

...म्हणून लोकलची प्रवासी क्षमता वाढवायला हरकत नाही; टाटा इन्स्टिट्यूटने दिली महत्वाची माहिती

भारतीय स्टेट बँकेत खाते असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन (सीएमपी) प्रणालीव्दारे शनिवारी कर्मचाऱ्यांच्या वेतन जमा करण्यात आले आहे. ज्या विभागातील वेतनाबाबत पूर्ण तयारी नसल्यास अथवा त्यांच्याकडे तांत्रिक अडचणी असल्यास अशा विभागाचे रविवारी किंवा सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाणार आहे. 

शैक्षणिक वर्ष तर सुरु झाले, मात्र विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांपुढे अडचणींचाच डोंगर

तसेच स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकत वेतन खाते असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन सोमवारी होणार आहे. यामध्ये मार्च महिन्याचे 25 टक्के, मे महिन्याचे 50 टक्के, जून महिन्याचे 100 टक्के वेतन दिल्या जाणार असून गेल्या जुलै महिन्यातील वेतन अदा करण्यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने परिपत्रकात सांगितले आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news for st workers, msrtc releases new order about salary