गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल; म्हणाले,कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खदखद...

कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खदखद होती आणि त्यामुळे एका काळानंतर आंदोलन भरकटले.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarEsakal

सांगली: एसटी कामगारांसोबत (ST Workers Strike) आम्ही कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. पोलिस चौकशीतून सत्य बाहेर येईलचं, कालची घटना नियोजनबध्द होती. मी आणि सदाभाऊ (Sadabhau Khot) आंदोलनानतर बाहेर पडलो. त्यानंतर ज्या मागण्या सरकारकडून मान्य झाल्या होत्या तितक्याच मागण्या ५ महिनंतर मान्य केल्यात. ५ महिने आंदोलन करून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या काही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खदखद होती आणि त्यामुळे एका काळानंतर आंदोलन भरकटले असे भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले. सांगलीच्या आरेवाडीमध्ये माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

Summary

ज्या मागण्या सरकारकडून मान्य झाल्या होत्या तितक्याच मागण्या ५ महिनंतर मान्य केल्यात.

Gopichand Padalkar
एसटी कर्मचाऱ्यांनी शांत राहावं; सदाभाऊ खोत यांचे आवाहन

पुढे ते म्हणाले, एसटी विलीनीकरण हा मुद्दा राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात होता. ज्यादिवशी आम्ही या आंदोलनातून बाहेर पडलो (२६ नोव्हेंबर२०२१) ला आणि त्या तारखेपासून कोर्टाचा निकाल येईपर्यंत सव्वीस तारखेला सरकारबरोबर आमचं चर्चेमध्ये ठरलं त्याच्यापेक्षा काही वेगळं या पाच महिन्यांमध्ये घडलं नाही. याच्यापेक्षा आता वेगळ काही होणार नाही अशी विनंती आम्ही त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांना केली होती. न्यायालयाची लढाई लढू असेही म्हणालो होतो. परंतु कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. विलीनीकरण, वेळेवर पगार नाही याची सल त्यांच्या मनात होती. परंतु आम्ही प्रामाणिकपणे एसटी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली.

Gopichand Padalkar
घरावर हल्ला करणं चुकीचंच, पोलिस काय करत होते? फडणवीसांचा सवाल

सदाभाऊ खोत आणि मी स्वतः सोळा दिवस आजाद मैदानवरती कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो. आम्ही बाहेर पडल्यानंतर सरकार आणि कर्मचारी यांच्यात कोणताच मेळ झाला नाही.चर्चा झाली नाही आणि सरतेशेवटी हे आंदोलन एका भरकटलेल्या दिशेने गेले. पोलिस यंत्रणा तपास करत राहिल. जोपर्यंत तपासातून, पोलिसांच्या माध्यमातून काही येत नाही तोपर्य़ंत बोलण उचित ठरलं अस वाटत नाही असेही ते म्हणाले.

कोल्हापूर उत्तरच्या निवडणूकीविषयी बोलताना ते म्हणाले, ही निवडणूक जनतेनी हातात घेतली आहे. ही निवडणूक कोणत्याही आता पुढाऱ्याच्या हातामध्ये राहिली नाही. सगळीकडे वातावरण भाजपाचे आहे. मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये जनतेने सरकारच्या विरोधामध्ये मतदान केलं. सरकारच्या विरोधामधील भावना लोकांनी मतदानातून व्यक्त केली. तशीच परिस्थिती कोल्हापुरात होणार असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील धनगर समाज आणि बहुजन समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबाच्या देवाची यात्रा काल आणि परवा होती. आज बिरोबाचे दर्शन घेण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस आरेवाडी बनामध्ये येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com