Ajit Pawar Controversy : "संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही त्यांची.." पडळकरांचं वादग्रस्त विधान

Padalkar Criticize Ajit Pawar Over ST Merger
Padalkar Criticize Ajit Pawar Over ST Mergeresakal

Gopichand Padalkar News: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर हल्लाबोल करत असतात. अनेकदा ते टीका करताना पातळी सोडतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही पडळकर यांनी अनेकदा वादग्रस्त टीका केली आहे. त्यातच आज पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Padalkar Criticize Ajit Pawar Over ST Merger
Sahitya Sammelan 2023 : महाराष्ट्र साहित्यिकांची सेवा करणारा देश; केसरकरांचे गौरवोद्गार

संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक या वादावर बोलताना आमदार पडळकर यांनी अजित पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. पडळकर म्हणाले की, संभाजी महाराजांना जे धर्मवीर मानत नाही, त्यांची कदाचित सुंता झाली असती, माध्यमांनी जाऊन पहा.

आज संभाजी महाराज यांच्या विषयी काही लोक चुकीचं बोलतात. त्यांना धर्मवीर बोलतात, पण संभाजी राजे हे स्वराज्यरक्षकच होते, असं अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावर भाजपने आक्रमक पावित्रा घेतला होता.

Padalkar Criticize Ajit Pawar Over ST Merger
Shrikant Shinde : 'अनाथांचा नाथ एकनाथ'नंतर 'आपला श्रीकांत शिंदे'; 'वर्षा'वर होणार गाण्याचं लाँच

राजे उमाजी नाईक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविषयी खळबळजनक वक्तव्य केलं आहं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com