

Ladki Bahin Yojana
ESakal
लातूर : महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ६५ वर्ष वयोगटात असणे गरजेचे असून याबाबत अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. दरम्यान, या योजनेच्या लाभासाठी कोट्यवधी महिलांचा अर्ज आले पाहता सरकारकडून पडताळणी केली जात आहे. यावेळी पडताळणीत लाखो महिलांनी अटींचे पालन न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सरकारने अशा लाडक्या बहिणीविरोधात कडक निर्णय घेतला आहे.