

Maharashtra Dry Day
ESakal
मुंबई : सध्या राज्यभरात निवडणुकीचे वारे वाहत असून विजयासाठी सर्व राजकीय पक्षांकडून चुरशीची लढत सुरु आहे. २ डिसेंबर रोजी २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील मतदानाच्या ठिकाणी ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. यामुळे अनेक शहरात मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे.