महत्वाची बातमी! दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात 'इतके' टक्के कपात होणार?..दोन दिवसांत येणार अंतिम निर्णय.. 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षण ऑनलाइल सुरू केले आहे. परंतु शाळा कधी सुरू करणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सुमारे 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार सरकार करत आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षण ऑनलाइल सुरू केले आहे. परंतु शाळा कधी सुरू करणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. यामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सुमारे 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोरोनामुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. केंद्र सरकारने आगामी शैक्षणिक वर्षांत शालेय अभ्यासक्रमात आणि शाळांमधील तासिकांमध्ये कपात करण्याची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली होती. तसेच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही याबाबत स्पष्ट संकेत दिले होते. 

हेही वाचा: मुंबईत रुग्णालयांमध्ये खाटांची लपवाछपवी थांबवण्यासाठी पालिकेनं घेतला 'हा' महत्वाचा निर्णय; वाचा महत्वाची बातमी..

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीआरटी) व केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड यांना जून महिन्यात दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात एक समान आशय असलेला भाग रद्द करावा, असा प्रस्ताव शिक्षण तज्ज्ञांनी सरकारसमोर मांडला आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात कपात करून नवीन शैक्षणिक सत्रांचा 2020-21 अभ्यासक्रम तयार करणार आहे. 

केंद्राप्रमाणेच यानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने तयारी सुरू केली आहे. विविध विषयांच्या अभ्यास मंडळ सदस्यांना त्यांनी अभ्यासक्रम कपात करून देण्यास सांगितले आहे. यानुसार अनेक अभ्यास मंडळांनी याबाबतचा आपला अहवाल परिषदेकडे सुपूर्द केले आहे. यानुसार सुमारे 20 ते 25 टक्के अभ्यासक्रम कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

हेही वाचा: मुंबापुरी तहानलेलीच, शहरात 8 तर उपनगरात फक्त 2 टक्के पावसाची नोंद

यात गणित, विज्ञान, भाषा या विषयांसाठी अभ्यासक्रम आणि तासिका कपातीचे वेगवेगळे निकष लागू करण्यात आल्याचेही सूत्रांकडून समजते. बारावीचा विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम कमी करताना केंद्रीय परीक्षा डोळ्या समोर ठेवून विचार करण्यात येणार आहे. तर दहावीचा अभ्यासक्रम कपात करत असताना विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी उपयुक्त गणित आणि विज्ञानातील पाठ कायम ठेवून अभ्यास मंडळांनी अभ्याक्रम कपात केल्याचे समजते. येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

government thinking of reducing course of tenth and twelve standards 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government thinking of reducing course of tenth and twelve standards