Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख बदलली! आता 'या' तारखेला होणार मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election 2022 date postponed voting will be on 16th october maharashtra political news

ग्रामपंचायत निवडणुकांची तारीख बदलली! आता 'या' तारखेला होणार मतदान

मुंबई : राज्यातील विविध १८ जिल्ह्यांच्या ८२ तालुक्यांमधील ११६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान होईल; तर मतमोजणी १४ ऑक्टोबर ऐवजी आता १७ ऑक्टोबरला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर आता १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणूका १६ ऑक्टोबर पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.

हेही वाचा: बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा देखील शिंदे गटात

टॅग्स :gram panchayat election