Gram Panchayat Election: राज्यातील 1165 सरपंचाच्या भवितव्यासाठी आज मतदान, उद्या गुलाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election: राज्यातील 1165 सरपंचाच्या भवितव्यासाठी आज मतदान, उद्या गुलाल

Gram Panchayat Election: राज्यातील 1165 सरपंचाच्या भवितव्यासाठी आज मतदान, उद्या गुलाल

राज्यात 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज (16 ऑक्टोबर 2022) मतदान होणार आहे. राज्यात 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमध्ये 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

राज्यातल्या 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

हेही वाचा: सह्याद्रीचा माथा : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचा दौरा अन् कानटोचणी

आज होणारी ही ग्रामपंचायत निवडणूक ही थोडी वेगळी आणि महत्त्वाची आहे. कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (17 ऑक्टोबर) लागणार आहे.1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. तर सोमवारी (17 ऑक्टोबर) मतमोजणी होणार आहे.