एसटीच्या फुकट्या प्रवाशांच्या दंडात जीएसटीची भर 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

एसटीत विनातिकीट प्रवासी आढळल्यास प्रवाशांना प्रवास भाडे आणि त्यात 18 टक्के वस्तु व सेवा कर (जीएसटी) लावण्यात येणार आहे.

मुंबई : एसटीत विनातिकीट प्रवासी आढळल्यास प्रवाशांना प्रवास भाडे आणि त्यात 18 टक्के वस्तु व सेवा कर (जीएसटी) लावण्यात येणार आहे. 100 रूपयांच्या तिकीटाच्या प्रवास भाड्यावर पाच पटीत ही दंड वसूली करण्यात येणार आहे. एसटीच्या वाहतुक महाव्यवस्थापकांनी विभाग निरीक्षकांना असे आदेश दिले आहे. 

सिग्नल बिघाडाचा प्रवाशांना फटका

महामंडळातील अनेक बसगाड्यांना दोन्ही बाजूंनी दरवाजे आहेत. गर्दीमुळे प्रत्येक प्रवाशांपर्यंत पोहोचण्यात तिकीट तपासनीसांना अडचणी येतात. अनेकवेळा गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी दरवाज्यातील पायऱ्यांवर उभे राहून प्रवास करतात. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांकडून मिळणारा दंड हे महामंडळाचे उत्पन्न म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे. यामुळे या उत्पन्नावर 18 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. 

म्हाडाकडून गिरणी कामगारांसाठी खूशखबर

मुंबईसह राज्यातील 31 विभागांना वाहतूक महाव्यवस्थापकांनी आदेश दिले आहे. असून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एसटीतून विनातिकीट प्रवास करणे महागाचे पडणार आहे. 

असा आकारणार दंड 
तपशील - दंडाची रक्कम - वस्तू व सेवा कर (टक्के)- प्रवाशांकडून आकारावयाची रक्कम - पाचच्या पटीत (रुपये) 
किमान दंड - 100 - 18 टक्के - 118 - 120 
दुप्पट दंड - 370 - 67 टक्के - 437 - 435 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST additional penalty of ST freight travelers