esakal | पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं रहावं, अजीर्ण होईल इतपत राहू नये: शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar : "हायड्रोजन गॅस हे पुढचे व्हर्जन"

पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं रहावं, अजीर्ण होईल इतपत राहू नये: शरद पवार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर आपली मते मांडली आहेत. केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सीमाप्रश्नावरही आपलं मत व्यक्त केलं.

हेही वाचा: एनसीबी, सीबीआय आणि ईडीचा भाजप वापर करतेय - शरद पवार

छापेमारीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी म्हटलंय की, मी अजित पवारांचं स्टेटमेंट वाचलंय. पाहुणे येतात अनेक ठिकाणी येतात. एक दिवस येतात, दोन दिवस येतात, तीन दिवस येतात. मात्र आजचा सहावा दिवस आहे. पाहूणचार घ्यावा, मात्र, त्यामध्ये अजीर्ण होईल इतपत पाहुणचार असू नये. माझा अनुभव असाय की, तिन्ही मुलींचा कारखाना नाहीये, एक पब्लिकेशनमध्ये आहे, एक डॉक्टर आहे आणि एक हाऊसवाईफ आहे. या तिघींचाही काहीही संबंध नाहीये. दोन-तीन दिवस झाले, घरचे वाट बघत असतील. आम्हाला सूचना आहेत, की सूचना मिळाल्याशिवाय, सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही.

हेही वाचा: मावळ गोळीबारावरून पवारांचे फडणवीसांना उत्तर!

पुढे ते म्हणाले की, आतापर्यंत अशा एजन्सीनी अनेकवेळा चौकशी केली आहे. मात्र असं सहा दिवस चौकशी करण्याचा प्रकार पहिल्यांदाच केला आहे. मात्र, याबाबत तक्रार करण्याची ही वेळ नाही. कोल्हापूरला चौकशी केली, तिथे फक्त 18 माणसं गेली. 18 दिवस सहा दिवस घऱामध्ये... पाहूण्यांनी घेतलेला हा पाहूणचार अडचणीचा होतो. जे पाहिलं नाही ते पहायला मिळतंय. सत्तेचा असा गैरवापर आम्ही कधी केला नाही, करणार नाही.

loading image
go to top