सरदार पटेलांनंतर गुजरातला मिळाला दुसरा सरदार; मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख

टीम ई-सकाळ
रविवार, 1 सप्टेंबर 2019

गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर दुसरे सरदार अमित शहा यांच्या रुपाने मिळाले आहेत, असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून आज (रविवार) सोलापुरात झालेल्या सभेत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात दोनवेळा अमित शहा यांचा दोनवेळा सरदार असा उल्लेख केला.

सोलापूर : गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर दुसरे सरदार अमित शहा यांच्या रुपाने मिळाले आहेत, असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून आज (रविवार) सोलापुरात झालेल्या सभेत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भाषणात दोनवेळा अमित शहा यांचा दोनवेळा सरदार असा उल्लेख केला.

उदयनराजेंसह अन्य नेते पोरं आहेत काय?- चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप आज सोलापुरात झाला. या यात्रेला अमित शहा उपस्थित होते. आज दुपारपासूनच सोलापुरात सरदार अमितभाई शहा असे पोस्टर्स लागले होते. पण, सरदार ही उपाधी दिल्याने सोशल मीडियावर चर्चा झाल्याने हे पोस्टर्स हटविण्यात आले. मात्र, सभेत अमित शहा यांचा सरदार म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांकडून दोनवेळा उल्लेख करण्यात आला.

अमित शहा 'म्हणतात काँग्रेसला लाज वाटली पाहिजे'

काश्मीरमधील कलम 370 हटवून अमित शहा यांनी काश्मीरच शल्य मनातून काढून टाकले. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा श्रीनगरमध्ये तिरंगा फडकला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना सरदार म्हटले. तसेच त्यांनी भाषणाच्या शेवटीही सरदार अमितभाई असा उल्लेख केला. तर, एका भाजप नेत्याने सरदार वल्लभभाई पटेल य़ांच्यानंतर सरदार अमितभाई शहा हेच आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat gets second Sardar Patel says CM Fadanvis