गावदेवी पोलिसांकडून सदावर्तेंच्या घराची झाडाझडती

यासंदर्भातील चौकशीसाठी सदावर्ते यांच्या घरी गावदेवी पोलिसांच एक पथक पोचलं आहे.
गावदेवी पोलिसांकडून सदावर्तेंच्या घराची झाडाझडती

गावदेवी पोलिसांचे एक पथक आज एसटी कर्मचाऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पोचले आहे. आज सकाळपासून वकील सदावर्ते यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने त्यांच्या घरी हे पथक पोचले असल्याची माहिती समोर येत आहे. आज बरात काळ अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून पोलिसांनी सदावर्ते यांची चौकशी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर आंदोलन करत चप्पलफेक आणि दगडफेक करण्यात आले होते. यासंदर्भातील चौकशीसाठी सदावर्ते यांच्या घरी गावदेवी पोलिसांच एक पथक पोचलं आहे.

गावदेवी पोलिसांकडून सदावर्तेंच्या घराची झाडाझडती
ST Strike | अनिल परब यांची उद्या एसटी महामंडळासोबत तातडीची बैठक

दरम्यान, पोलिसांचे पथक अजूनही गुणरत्न सदावर्ते यांचा क्रिस्टल टॉवर हे निवासस्थानी तपास करत आहे. या निवासस्थानी असलेले सुरक्षारक्षक, सहकारी, कामगार यांच्याकडून वेगवेगळ्या अनुषंगाने तपास केला जात आहे. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर त्या दिवशी किंवा त्याआधी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी भेटीसाठी आलं का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ताब्यात घेतलेल्या 109 जणांपैकी कुणी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी भेटीसाठी आलं का? याचा तपास सीसीटीव्हीचे फुटेजद्वारे केला जाणार आहे. तसेच याठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या अनेकांचे रजिस्टर मेंटेन केले जाते त्याचा तपास पोलिस करत आहेत.

या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य १०९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अटकेत असलेले सदावर्ते हे सातत्याने पोलिसांवर आरोप करत आहेत. पोलिस त्यांना कोर्टात घेऊन आले तेव्हा 'माझी हत्या होऊ शकते, पोलिस लोकशाहीचा गळा घोटत आहेत', असा आरोप त्यांनी केला. अटकेच्या कारवाईदरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीवर सदावर्ते यांनी आक्षेप घेतला. चष्मा तुटल्याचा तसेच धक्काबुक्की झाल्याचाही त्यांचा दावा होता. याबाबत न्यायमूर्ती स्वत: खातरजमा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

गावदेवी पोलिसांकडून सदावर्तेंच्या घराची झाडाझडती
"...कुठल्याही सणाच्या दिवसांमध्ये मांसाहारावर बंदी नको"- जितेंद्र आव्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com