कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणार अक्‍कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा साधेपणाने 

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 4 July 2020

सालाबादप्रमाणे न्यासाच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून यंदाचा 33वा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त 10 दिवसांच्या धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी करण्यात आलेली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम रद्द करून कोरोना विषाणूचा संसर्ग व गर्दी टाळण्यासाठी साध्या पद्धतीने वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता "श्रीं'ची नित्योपचार पूजा व महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अन्नछत्र मंडळाचा रविवार, 5 जुलै रोजीचा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याची माहिती न्यासाचे संस्थापक- अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. देश-विदेशात अन्नदान सेवेत अग्रगण्य असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यंदाचा 33वा वर्धापनदिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संपन्न होणारे धर्मसंकीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम हे कोरोना राष्ट्रीय आपत्तीमुळे रद्द करण्यात आले असून, केवळ पाचजण मंदिरात जाऊन नेवैद्य अर्पण करणार आहेत. 

हेही वाचा : कोरोनासह जगण्यासाठी "या' उद्योगाने टाकलीय कात! धरली वेगळी वाट 

सालाबादप्रमाणे न्यासाच्या वतीने गेल्या सहा महिन्यांपासून यंदाचा 33वा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त 10 दिवसांच्या धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी करण्यात आलेली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम रद्द करून कोरोना विषाणूचा संसर्ग व गर्दी टाळण्यासाठी साध्या पद्धतीने वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता "श्रीं'ची नित्योपचार पूजा व महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. न्यासाच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाचे 11वे वर्ष होते. 

हेही वाचा : जिल्हा बॅंकांची वाढली 23 हजार कोटींची थकबाकी; 23 बॅंकांची वसुली 40 टक्‍क्‍यांपेक्षाही कमीच 

दरम्यान, न्यासाचे स्वामीभक्तांसाठी अन्नदानाचे स्वामीकार्य कोरोना विषाणूच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून थांबले आहे. या महामारीमुळे अन्नदान सेवा तात्पुरती स्थगित आहे. येथे सेवा करणारे 300 सेवेकरी आहेत. जरी अन्नदानाचे कार्य थांबले असले तरी न्यासाच्या बायलॉजप्रमाणे, सामाजिक, आरोग्यविषयक, पर्यावरणपूरक, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण-संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन मदतकार्य आदी उपक्रम चालू आहेत. कोरोना विषाणूला हरविण्यासाठी वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय साधनसामग्री, स्वच्छतेसाठी लागणारी साधनसामग्री आदींची मदत हे न्यास सातत्याने करीत आहे. नागरिकांना मास्क, सॅनिटाझरचे वाटप करण्यात येत आहे. गरजू, गरीब, निराधार व परप्रांतियांना मोफत अन्नदान करण्यात येत आहे. 

कोरोना विषाणूसंदर्भात न्यासाच्या वतीने विलगीकरण कक्ष सुरू करून चांगली व्यवस्था केली व त्याचप्रमाणे शहर व ग्रामीण भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात येत आहे. वैद्यकीय मदत व सेवा पुरविण्यात येत आहे. 15 मार्चपासून अन्नदान सेवा तात्पुरती स्थगित असून महाप्रसाद गृह, यात्री भुवन, यात्री निवास, निवासी व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. परगावच्या भाविकांनी या उत्सवास न येता आपल्या घरातच स्वामीपूजा व आराधाना करावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धर्मसंकीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून श्री गुरुपौर्णिमा व वर्धापन दिनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याबाबतचा निर्णय अन्नछत्र मंडळाने घेतला आहे, याची सर्व भाविकांनी कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थापक- अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी केले आहे. 

कोरोनाला हरवूया! 
जगात कोव्हिड-19 ने थैमान घातलेले आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. कोव्हिडयोद्धे हे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. आपण या सर्वांना सहाय्य करूया. नागरिकांनी देखील मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे. घरातच राहून, नियम पाळून कोरोनाला हरवूया, असे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्रा मंडळाचे विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांनी केले आहे. 

पाचजणांकडून "श्रीं'ची नित्योपचार पूजा व महानैवेद्य अर्पण 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍यामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व सोमनाथ पुजारी हे "श्रीं'ची नित्योपचार पूजा व महानेवैद्य अर्पण करणार आहेत. 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurupournima will be celebrated simply at Akkalkot Swami Samarth Temple against the backdrop of Corona