Hari Narke Death : लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करत राहिले; नरकेंनी मृत्यूआधी केला होता मेसेज

लेखक संजय सोनवणी यांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ
Hari Narke Death
Hari Narke Deathesakal

Lilavati Hospital Mislead The Diagnosis Of Hari Narke Health :

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे बुधवारी दि. ९ ऑगस्ट २०२३ ला वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात हृदयविकारावर उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी जून महिन्यात आपले मित्र लेखक संजय सोनवणी यांच्याशी व्हॉट्सअॅपवर साधलेल्या संवादात लीलावती रुग्णालयाने त्यांच्या गंभीर आरोग्याविषयी कसा निष्काळजीपणा केला हे नमूद केले होते.

याविषयीची पोस्ट सोनवणी यांनी फेसबुकवर शेअर केल्यावर समाजातून लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाविषयी टीका केली जात असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हरी नरके यांनी मित्र सोनवणी यांच्याशी बोलताना लीलावती रुग्णालयाच्या निष्काळजीपणाविषयी सांगितले. सोनवणी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, "प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांचा २२ जून २०२३ ला मला व्हॉट्सअॅप संदेश आला होता."

तो संदेश

“प्रिय भाऊ, नमस्कारगुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊनपुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे.

आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता.

ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला.

मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो.

जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते.

हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.

लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले.

लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला. regards.[14:29, 22/06/2023] Hari Narke 2: हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.आता बरा होतोय.”

माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?

Hari Narke Death
Hari Narke Passed Away : हरी नरकेंच्या निधनाने छगन भुजबळ व्यथित; म्हणाले, हातपाय गळाल्यासारखी परिस्थिती...

दोषींवर कारवाईची मागणी

या संदर्भात दिव्य मराठीमध्ये आलेल्या वृत्तानुसार सोनवणी यांनी दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली आहे. यावर ते म्हणाले डॉक्टर प्राणदानासाठी असतात की, प्राण घेण्यासाठी यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा.

डॉक्टरांनी आयएबी रिपोर्ट्सकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले. जवळपास १० महिने त्यांच्यावर चुकीचे औषधोपचार झाले. यामुळे मूळ आजार बळावून हरीभाऊ अकाली गेले.

यामुळे राष्ट्रीय वैचारीक संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा मृत्यू हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे. दोषी डॉक्टर्सवर कायदेशीर कारवाई का होऊ नये, असा सवाल त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com