कोल्हापूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यासाठी लोकांकडून पैसे संकलित केले. मात्र हे पैसे त्यांनी शेल कंपन्यात गुंतवणूक करुन शेतकर्यांची फसवणूक केली असल्याची टिप्पणी ईडीच्या विशेष न्यायालयाने (पीएमएलए) केली आहे.
न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे मंत्री मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात अटकेत असलेला सी.ए. महेश गुरव याचा जामीनही विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्यांकडून पैसे जमा करण्यात आले होते. मात्र हे पैसे खाजगी कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आले. या शेल कंपन्यांच्या संचालक मंडळात मंत्री मुश्रीफ यांची मुलं कार्यरत आहेत. साखर कारखान्याच्या नावे पैसे गोळा करुन अन्य कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत मंत्री मुश्रीफ यांनी शेतकर्यांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण ईडीने नोंदवले आहे.
महेश गुरव हा संताजी घोरपडे साखर कारखान्याचा तसेच मंत्री मुश्रीफ यांच्या मुलांच्या खाजगी कंपन्यांचा लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याला हसन मुश्रीफ आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांमधून कमावलेल्या पैशांची ठोस माहिती होती, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. गुरव याचा जामीन अर्ज फेटाळल्याने मंत्री मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.