Sanjay Shirsat: संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर शिंदे-भाजप नाराज, समज देण्याची शक्यता!

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat

Sanjay Shirsat: शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना समज दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यात तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावे, असे वक्तव्य शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. मात्र या वक्तव्यावरुन आता महायुतीत अंतर्गत राजकारण पाहायला मिळत आहेत.

भाजप आणि शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकित संजय शिरसाट यांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. पत्रकांरानी संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर फडणवीस म्हणाले, त्यांच्या शुभेच्छा मान्य आहेत. (Latest Marathi News)

Sanjay Shirsat
Pat Cummins : पॅट कमिन्सला नाही भारताच्या फिरकीची चिंता... ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं असा कोणता प्लॅन केलाय?

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावे. तसचे देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं काम करत आहेत. त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं. कॅपेसिटीचा भाग फडणवीस यांच्याकडे आहे. म्हणून आम्हालाही वाटतं त्यांनी तेही नेतृत्व केलं पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले होते.

Sanjay Shirsat
Earthquake News : अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप; 14 जणांचा मृत्यू, 78 जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com