
IMD Predicts Widespread Rainfall in Maharashtra for 72 Hours
Esakal
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात गेल्या आठवड्याभरापासून अतिवृष्टीने हाहाकार उडालाय. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झालीय. पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पुराचा धोका व्यक्त केला जातोय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.